श्री गाडगे महाराज आश्रमशाळा, ओतूर, ता.जुन्नर, जि.पुणे येथे पुणे, अहमदनगर, ठाणे, नाशिक अशा विविध जिल्ह्यांतून आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डोंगर द-यात जन्माला आलेल्या विद्यार्थ्यांना घरापासून दूर वसतिगृहात राहणे म्हणजे खुपच अडचणीचे वाटते. त्यामुळे शिक्षण महत्त्वाचे असले, तरी आई वडिलांपासून दूर राहावे लागणार असल्याने मुले-मुली शाळेत जायला मागत नाहीत. पालकांनाही शिक्षणाचे अधिक महत्त्व नसल्याने अनेकदा पाल्य शाळेत जाण्यास नकार देत असेल तर पालक त्याला शाळेत पाठविण्यासाठी आग्रह धरत नाहीत. परिणामी अनेक मुलांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते.
शिक्षणाची गोडी मुलांना लागावी यासाठी सर्व सुविधांनीयुक्त असे घरासारखे प्रेमळ व आपले हवेहवेसे वाटणारे वातावरण शाळेत असेल तर अशी मुले शाळेत येऊन चांगले शिक्षण घेऊ शकतात. याच भावनेतून दर्जेदार शिक्षण देण्याचे काम गाडगे महाराजांच्या विचारांतून आपल्या शाळेत केले जाते. आज आश्रमशाळा म्हटली कि समाजात खुपच नकारात्मक भावना पहायला दिसून येते. याच्या अगदी विरुध्द व अतिशय सकारात्मक वातावरण निर्मिती असणारे पुणे जिल्यातील आपले हक्काचे शैक्षणिक घर म्हणून आपण आपल्या शाळेकडे बघू शकतो.
आदिवासी मुलांना शाळेत आणणे जसे आव्हानात्मक आहे, तसेच त्यांना अध्यापन करून त्यांना शाळेत टिकवणे खुपच जबाबदारीचे आहे. अशा वेळी शाळेत विविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षक सतत कार्यतत्पर असतात.
वसतिगृहात राहणा-या डोंगर द-यांतील मुला-मुलींसाठी अभ्यासिकेच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले जातात. आपल्या घरात लाईट कमी असली तर चालेल, परंतु मुलांच्या अभ्यासासाठी पुरेसा प्रकाश असला पाहिजे ही भूमिका घेऊन इथे काम करणारी व्यवस्था.....खरंच अफलातून आहे सर्व...!
याचेच सार म्हणजे आज NMMS च्या परीक्षेत वसतिगृहातील मुलांनी मिळविलेले हे यश आहे.
ओतूरमध्ये अनेक शाळा आहेत. त्या तुलनेत आश्रमशाळेची तशी स्वतंत्र ओळख इथे आजही नाहीच. परंतु अनेक आव्हानांना सामोरे जात, परिस्थितीशी संघर्ष करत या प्रांगणात आलेल्या मुलांनी आजच्या निकालाने खूप काही शाळेच्या पदरात टाकलंय.
शाळा व शालेय व्यवस्थापन त्या सर्वच विद्यार्थी व पालकांचे खूप आभारी आहे, ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखविला.
चेअरमन: श्री मधुसूदन मोहिते पाटील
संचालक : श्री नितीन पाटील
मुख्याध्यापक:
१) श्री.के.एस.दांडगे - प्राथमिक मुख्याध्यापक
२) श्री.आर.एल.ठोकळ - माध्यमिक मुख्याध्यापक
संपर्क : ९८९०१५१५१३
शाळेतील सुविधा:
१) प्रशस्त इमारत
२) मुला-मुलींसाठी निवासाची स्वतंत्र सुविधा
३) निसर्गरम्य वातावरण
४) खेळासाठी पुरेसे मैदान
५) पुरेसा शिक्षक वर्ग
६) विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन
७) निकालाची उत्कृष्ट परंपरा
८) आरोग्यविषयक सुविधा
९) पोषक व आरोग्यदायक आहार
१०) नियमित अभ्यासिका
११) स्कॉलरशीप परीक्षांची पूर्वतयारी व उत्कृष्ट निकालांची परंपरा
१२) समुपदेशन
१३) विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment