सह्याद्रीच्या
पर्वत रांगा, माळशेजची
नागमोडी वळणे, धुक्याची दुलई घेऊन कोसळणारे उंच धबधबे, रानपाखरांचे मधुर स्वर, औषधी वनस्पतींचा अनोखा खजिना, तहानलेल्या जमिनीची तहान भागवणारी धरणे, तुकाराम महाराजांचे गुरु जगदगुरु चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी, तुकाराम महाराजांना याच भूमीत स्वप्नात येऊन चैतन्य महाराजांनी 'राम कृष्ण हरी' हा मंत्र दिला अशा
विविधतेने नटलेल्या जुन्नरच्या भूमीत कपर्दिकेश्वर मंदिराच्या बाजूला मांडवी
नदीच्या तीरावर श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित श्री गाडगे महाराज विद्यालय, श्री गाडगे महाराज प्राथमिक / माध्यमिक आश्रमशाळा, सेंट डेबुज स्मार्ट स्कूल, बचपन इंग्लिश मेडीयम स्कूल यांची
स्थापना झालेली आहे. श्री गाडगे महाराजांच्या विचारांनी सुरु झालेल्या या शैक्षणिक
वटवृक्षाच्या आजूबाजूला अनेक किल्ले, लेणी, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक ठेवा जपणारी
स्मृतीस्थळे, स्वराज्याचे महामेरू छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण अशा
उल्लेखनीय बाबी आहेत.
श्री
गाडगे महाराज मिशन शाखा ओतूरचा शाखा विस्तार
१)
श्री गाडगे
महाराज प्राथमिक आश्रमशाळा, ओतूर
स्थापना : दि. १ जून १९६०
वर्ग : इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी
शिक्षक संख्या : ७
इतर कर्मचारी : ९
विद्यार्थी संख्या : २४४
२)
श्री गाडगे
महाराज विद्यालय, ओतूर
स्थापना : जून १९६८
वर्ग : इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी
तुकडी संख्या : २०
शिक्षक संख्या : २६
शिक्षकेतर कर्मचारी : ७
विद्यार्थी संख्या : ८६३
३)
श्री गाडगे
महाराज माध्यमिक आश्रमशाळा, ओतूर
स्थापना : दि.१० जून १९७३
वर्ग : इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी
शिक्षक संख्या : ४
शिक्षकेतर कर्मचारी : ६
विद्यार्थी संख्या : १५२
४)
श्री गाडगे
महाराज इंग्लिश मेडीयम विद्या मंदिर, ओतूर
स्थापना : जून २०१०
वर्ग : इयत्ता Jr. KG ते १० वी
शिक्षक सख्या :
शिक्षकेतर कर्मचारी :
५)
बचपन ए प्ले
स्कूल, ओतूर
स्थापना : २०१४
वर्ग : प्ले ग्रुप आणि नर्सरी
मुख्याध्यापिका :
शिक्षक संख्या :
विद्यार्थी संख्या :
६)
ब्रिलीयंस
इंग्लिश मेडीयम स्कूल, ओतूर
स्थापना : २० जून २०१६
वर्ग : इयत्ता पहिली व दुसरी
मुख्याध्यापिका :
शिक्षक संख्या : ३
विद्यार्थी संख्या : १४
७)
श्री गाडगे
महाराज आदिवासी विद्यार्थी वसतीगृह, ओतूर
स्थापना : सन १९६०
विद्यार्थी संख्या : ८४
८)
श्री गाडगे
महाराज जनता विकास विद्यार्थी वसतीगृह, ओतूर
स्थापना: सन १९६२
विद्यार्थी संख्या : ६६
९)
श्री गाडगे बाबा
कन्या छात्रालय, ओतूर
स्थापना : सन १९६३
मंजूर विद्यार्थी संख्या : ४२
१०)
श्री गाडगे
महाराज निराधार बालकाश्रम, ओतूर
स्थापना : सन १९८२
विद्यार्थी संख्या : १५०

0 comments :
Post a Comment
Thanks for your comment