श्री गाडगे
महाराज मिशन मुंबई संचालित श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ओतुरमध्ये
पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे अशा विविध जिल्ह्यांतील आदिवासी विद्यार्थी
शिक्षण घेण्यासाठी येतात. सन १९६० पासून या शाळेने आपल्या शिक्षणातील
सेवेचा ठसा उमटवत अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन
समाजाच्या परिवर्तनात हातभार लावला आहे. शिक्षण फक्त चार भिंतीत मर्यादित
न ठेवता संतश्रेष्ठ श्री गाडगे महाराज यांच्या 'सेवा परमो धर्म' या
घोषवाक्याला सार्थ ठरवत घराघरात...गावागावात...पाड्यापर्यंत जिथे कोणत्याही
सुविधा पोहचलेल्या नव्हत्या, तिथे शिक्षण पोहचवले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या असताना गावोगाव...घरोघर जाऊन शिक्षकांनी पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. आजही हे कार्य अविरतपणे सुरु आहे. अनेकदा माजी विद्यार्थी भेटतात...काही शाळेत येऊन भेट देतात व जुन्या आठवणी...त्या काळातील शिक्षक...शिक्षण...शिस्त....आणि आज त्याचा आपल्या जीवनात झालेला फायदा याविषयी माहिती देतात. हाच ऋणानुबंध जपण्याचे काम करत असताना समाजात आपले विद्यार्थी एक आदर्श नागरिक म्हणून पुढे गेले पाहिजेत यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
शालेय उपक्रम, खेळ, स्पर्धा, जयंत्या, पुण्यतिथ्या, स्नेहसंमेलन, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आजही सुरु आहे.

0 comments :
Post a Comment
Thanks for your comment