वाचन संस्कृती-- काळाची गरज !

 

वाचन संस्कृती-- काळाची गरज !

श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, ओतूर येथे दि. 15 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 11:00 ते 05:00 या वेळेत मोठ्या उत्साहात 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला.

आजच्या तरुणाईला मोबाईल, टीव्ही, इंटरनेटच्या वेडाने वाचनाची आवड चिंताजनकरित्या कमी होत असल्याचे चित्र सगळीकडे आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यात शाळेच्या ग्रंथालयातील हजारो पुस्तके विद्यार्थ्यांसाठी मांडली होती. तसेच पुणे येथील श्रीमती सुनीता बुरसे, श्री विशाल गोंदके, कीर्ती कोलते यांच्याद्वारे भेट देण्यात आलेली पुस्तके ग्रंथालयास सुपूर्द करण्यात आली.

वाचन प्रेरणा हि खरे तर या तरुणाईची गरज आहे. असे असताना आपण या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन या उपक्रमाला गती व ताकद देण्याची गरज आहे असे मत श्री ठोकळ आर.एल.(मुख्याध्यापक) यांनी
व्यक्त केले.

आपण आपल्या पुढाकारातून फक्त 20 ते 25 रुपये किंमतीचे एक पुस्तक आपल्या आश्रमशाळेतील मुलांना भेट द्यावे हि माफक अपेक्षा. या फुलांना....या मुलांना अंकुरता यावे स्वाभिमानाने व देशाच्या भविष्यासाठी त्यांचं योगदान असावं अभिमानानं म्हणून आज त्यांना अशा विविध उपक्रमांतून प्रेरित करणे आवश्यक आहे.
आजच्या तरुणाईचा प्रवाह कोणत्या वळणावर आहे याची चिंता अलीकडे सगळीकडेच चर्चेत येत आहे. शाळा, कुटुंब, समाज हि संस्कारांची उगमस्थाने या मुलांच्या दृष्टीने मर्यादित तर नाही ना पडत अशा शंका आता पुढे येत आहेत. तर चला सर्वांच्या पुढाकारातून आपल्या शाळेतून एक प्रगल्भ अनुभव या मुलांना देऊ या....!

गाडगे महाराजांच्या शिकवणुकीतून चांगल्या शिक्षणासाठी आपण बांधील आहोत. ती गरज आपण अधिक क्षमतेने पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करूयात...!

#वाचन_प्रेरणा_दिन
#15_Oct_2016
#श्री_गाडगे_महाराज_आश्रमशाळा_ओतूर

0 comments :

Post a Comment

Thanks for your comment

 


Our School

Shri Gadge Maharah Ashram School, Otur is more than a home away home for our students. It is a place where we build the characters with the thoughts of Saint Gadge Maharaj.

Popular Posts

Blog Archive







Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews






Featured Post

श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

     श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वात...

Translate

Books

  • आदिवासी मुलांचे शिक्षण
  • Wings of Fire
  • Hamlet
  • BHALAR

Followers

External Links