श्री गाडगे महाराज आश्रमशाळा, ओतूर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा दि.५/१२/२०१६ रोजी मोठ्या उत्साहात सुरु करण्यात आल्या. या स्पर्धांचे उदघाटन श्री जगताप सर् यांच्या हस्ते करण्यात आले. आज कबड्डी व खोखो या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मोठा गट (इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी) व लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी) अशा दोन गटांत स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते. मुला-मुलींनी आज या स्पर्धांचा खूप आनंद घेतला.
स्पर्धा आयोजनासाठी श्री जगताप सर, श्रीमती डुंबरे व्ही.बी., श्री.फल्ले पी.एस., श्री.खुळे ए.डी., श्रीमती मेटांगे एच.ए., श्री. थोरात सर, श्री डुकरे सर, श्री.निक्रड सर यांचे सहकार्य लाभले.
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment