अरमान चॅरिटी मुंबई यांच्या वतीने व क्रान्तिदीप आदिवासी बहुउद्देशीय संस्था, घोटकरवाडी, ता.अकोले यांच्या मदतीने सुमारे 125 गरजू कुटुंबांना मोफत 10 किलो गहू व 10 किलो वाटण्याचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकीचा वसा जपत मुंबईतील अरमान चॅरिटी यांच्या सदस्यांनी गावाकडील गरीब व गरजू कुटुंबांना मोफत धान्य वाटपाचा वसा घेतलेला आहे. त्यांच्या पुढाकारातून यावर्षी घोटकरवाडी परिसरातील कुटुंबांना धान्य वाटपाचा विचार पुढे आल्यानंतर क्रान्तिदीप बहुउद्देशीय संस्थ्येच्या सदस्यांनी गावातील प्रत्येक घरी जाऊन सदर कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
रविवार दि.4/12/2016 रोजी गावातील व परिसरातील लोकांनी चावडीकडे येण्यास
सुरुवात केली होती. बाहेरून आपल्या गावात पाहुणे येणार म्हटल्यावर
त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. चावडीपुढे स्वच्छता करून
बसण्यासाठी ताडपत्री अंथरण्यात आली होती. कार्यक्रमाची वेळ 10:30 असल्याचे
सांगितले असले, तरी पाहुण्यांना अनोळखी रस्त्यांवरून येताना काहीसा उशीर
होणार असल्याने सर्वांना चावडीसमोर बसवून श्री राजू ठोकळ यांनी आदिवासी
संस्कृती संवर्धन व शिक्षणाचे महत्त्व या विषयावर लोकांना माहिती सांगितली.
तसेच काशिनाथ भवारी यांनी आदिवासींच्या जुन्या प्रथांचे महत्त्व समजावून
सांगितले व त्या दैनंदिन जीवनात अंगिकारण्याचे आवाहन केले. श्री ठोङ्गिरे
सर यांनी पेसा विषयी माहिती सांगितली.
शेवटी पाहुण्यांचे आगमन झाले व सर्वांच्या चेह-यावर आनंद व उत्साह संचारला. अभिषेक जैन यांनी मुंबई व गावाकडील जीवन यातील फरक समजावून सांगतांना गावाकडील लोकांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अशोक धिंदळे यांनी केले.
शेवटी पाहुण्यांचे आगमन झाले व सर्वांच्या चेह-यावर आनंद व उत्साह संचारला. अभिषेक जैन यांनी मुंबई व गावाकडील जीवन यातील फरक समजावून सांगतांना गावाकडील लोकांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अशोक धिंदळे यांनी केले.
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment