सामाजिक बांधिलकी जपत पुण्यातील अमित व खुशबूने आपली मुलगी 'दिवा' हिचा पहिला वाढदिवस आश्रमशाळेतील मुलांबरोबर साजरा केला. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अनमोल अशी पुस्तके भेट दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता भरपूर आहे. परंतु पुरेशा संधी मिळत नसल्याने ते मागे पडतात. या विद्यार्थ्यांना अवांतर ज्ञानाच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून अमित व खुशबू यांनी आश्रमशाळेतील मुलांना पुस्तके भेट दिली.
अमितने आपले मनोगत व्यक्त करताना इंग्रजी भाषेवर कठोर मेहनतीने प्रभुत्व मिळवा व मग बघा जग जिंकण्याची ताकद तुमच्यात येईल असा सल्ला दिला. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअरच्या अनेक संधी संधी आहेत. त्यांची आतापासूनच आपण तयारी करावी असेही मत त्याने व्यक्त केले. तसेच आपल्या सुमधुर आवाजात अनेक गीतांचे गायन केल्याने एक वेगळा उत्साह विद्यार्थ्यांच्या चेह-यावर दिसत होता.
दिवाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment