कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. मंचावर शाळेतील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. महिलांची आजच्या समाज घडणीतील प्रमुख भूमिका व तिचे महात्म्य व्यक्त करण्याचे काम वक्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
सर्व शिक्षकांच्या वतीने शिक्षकांना पेन भेट देण्यात आला. यामागे उद्देश
हाच कि आजच्या महिलांनी आपल्यावर होणा-या अत्याचारांनी खचून न जाता या
व्यवस्थेत आपल्या सन्मानासाठी, आपल्यावरील अन्यायाविरोधात लेखणीच्या
माध्यमातून आवाज उठविला पाहिजे.
इयत्ता चौथीच्या मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कामागिरविषयी मनोगत व्यक्त केले, तर आठवी नववीच्या विद्यार्थिनींनी समाजात वावरत असताना किती आव्हानांना सामोरे जावे लागते व यातून मार्ग कसा काढावा याविषयी आपले विचार व्यक्त केले.
संस्कारांच्या जडणघडणीत माहिलकाची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचे मत श्री जगताप सर यांनी व्यक्त केले. तर श्रीमती शिंदे मॅडम यांनी महिलांनी आपल्या क्षमता ओळखून विविध क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी पुढे आले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला. श्रीमती मेटांगे मॅडम यांनी जागतिक महिला दिनाचा इतिहास मुलांसमोर मांडला. तर श्री डुकरे सर व थोरात सर यांनी जगात महिलांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीवर प्रकाश टाकला.
श्री खुळे सर व श्री साबळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री फल्ले सर यांनी आभार मानले.

0 comments :
Post a Comment
Thanks for your comment