ओतूर येथील श्री गाडगे महाराज आश्रमशाळेत शिवजन्म सोहळा मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मुलांनी स्वागत गीत, शिवाजन्माचे पोवाडे अतिशय सुंदरपणे सादर केले. अगदी 2 री 3री च्या बालचमूपासून ते 10 वी च्या मुलांनी आपल्या मनोगतातून आजच्या युगात शिवकार्य व शिवरायांचे विचार किती महत्त्वाचे आहेत याचे महत्त्व विशद केले.
खास औचित्य साधत वार्षिक क्रीडा स्पर्धेत यश संपादित केलेल्या मुलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

एक वेळ दिवाळी घरातल्या घरात साजरी करू, पण शिवजयंती आम्ही जनमाणसात साजरी
करू असे अनंत विचार विद्यार्थ्याच्या तोंडून ऐकताना संपूर्ण वातावरण
शिवरायमय झालेला होता.
आपण ज्या मातीत जन्माला आलो, त्या मातीच्या सन्मानासाठी शिवरायांनी आपले आयुष्य पणाला लावले... त्या शिवरायांचा अभिमान रक्तात असेल तर आम्ही शिवजयंती साजरी करताना तो एक महोत्सव म्हणूनच करू असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिवजयंती मुलांसोबत साजरी करण्याचे महत्त्व विशद करताना श्री राजू ठोकळ यांनी विचारांचा परिपाक म्हणजे शिवराय आणि अशा या महान व्यक्तिमत्त्वाला जगाने एक आदर्श म्हणून स्वीकारले असताना आपण मोठ्या दिलाने हा जन्मोत्सव साजरा करावा असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमात इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेला शिवाजी महाराजांची प्रतिमा सप्रेम भेट दिली.

0 comments :
Post a Comment
Thanks for your comment