महाराष्ट्र राज्य
परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक
शिष्यवृत्ती परीक्षा (एन.एम.एम.एस.) निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात
श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा,
ओतूरचा निकाल चांगला लागला आहे. या परीक्षेत शाळेचे ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
आले आहेत. शाळेचा निकाल ५०% लागला असून पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झालेले
विद्यार्थी अनुक्रमे १) मेमाणे प्रफुल्ल मधुकर (एस.टी.गुणवत्ता यादी क्र.
०४), २) पोफळे भूषण चिंधू ( एस.टी.गुणवत्ता यादी क्र. १२), ३) धिंदळे
मनिषा सुभाष ( एस.टी.गुणवत्ता यादी क्र. १७७) असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे
अभिनंदन व कौतुक संचालक श्री नितीन पाटील, मुख्याध्यापक राजू ठोकळ, कैलास दांडगे,
मंगल साबळे, प्रशांत फल्ले, वैशाली डुंबरे, अरुण खुळे, हर्षदा मेटांगे, राजकुमार
मिरगे यांनी केले.
राष्ट्रीय
आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना असून ही मिनिस्ट्री ऑफ
ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या मार्फत राबविली जाते. आर्थिक
मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची
जोपासणा, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण सुलभतेने पुर्ण व्हावे हा या योजनेचा
गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्तीच्या स्वरूपात
आर्थिक मदत करण्यात येते. इयत्ता ८ वीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे
उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा कमी आहे व महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य
अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या
विद्यार्थ्यास परीक्षेस बसता येते.
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment