श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, ओतूर येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ लिपिक राजकुमार मिरगे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन नुकतेच शाळेच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात करण्यात आले. राजकुमार मिरगे यांनी शाळेत तब्बल 37 वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत, शाळेच्या कामकाजात अमूल्य योगदान दिले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात गाडगे बाबांच्या पुतळ्याला हार घालून व दीपप्रज्वलनाने झाली. मुख्याध्यापिका वैशाली डुंबरे यांनी राजकुमार मिरगे यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांची शिस्तबद्धता, प्रामाणिकता, संयम आणि नम्रता याबाबत गौरवोद्गार काढले. शाळेचे शिक्षक राजू ठोकळ यांनी राजकुमार मिरगे यांच्या शालेय कार्यात गाडगे बाबांचे विचार कसे प्रकर्षाने जाणवतात याबाबत मनोगत व्यक्त करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील इतर कर्मचाऱ्यांनीही त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी राजकुमार मिरगे यांचे शैक्षणिक कार्य हे एखाद्या संतासारखे असल्याचे मत मांडून त्यांनी घालून दिलेला आदर्श येणाऱ्या काळात सर्वांनाच मार्गदर्शक असेल असा विश्वास व्यक्त केला.
शाळेचे माजी विद्यार्थी व लोकशाहीर भीमराव ठोँगिरे यांनी राजकुमार मिरगे यांच्या कार्यावर आधारित एक गौरव गीत सादर केले.
आपल्या अध्यक्षिय मनोगतात ह.भ.प.तुळशीराम महाराज सरकटे यांनी गाडगे बाबांच्या विचारांचा पाईक असलेला कर्मचारी कसा असावा तर तो राजकुमार मिरगे यांच्या सारखा असावा असे मनोगत व्यक्त केले. गाडगे बाबांनी आपल्या विचारांनी व आचारांनी समाजात जनजागृती केली. त्याचप्रमाणे मिरगे सर यांनी आपल्या 37 वर्षांच्या सेवाकाळात आपल्या शाळेतच नव्हे तर परिसरातील अनेक शाळांच्या निर्मितीत व विकासात एका मार्गकदर्शकाची भूमिका पार पाडली. याचा फायदा बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करण्यास मदत झाली.
यावेळी श्री ज्ञानेश्वर दत्तात्रय डोके, सचिव आदिवासी शिक्षण संस्था जुन्नर श्री देवराम मुंढे, श्री. नामदेव नंदकर, श्री शरदअण्णा चौधरी, श्री. महेंद्र गणपुले, लोकशाहीर भीमराव ठोंगिरे, श्री. तबाजी वागदरे, श्री. अशोक काकडे, वरिष्ठ सहाय्यक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव श्री.दादाभाऊ लोहकरे, ह.भ.प. गंगाराम महाराज डुंबरे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नितीन पाटील, अरुण वाकचौरे, शैलेश मिरगे, श्री.पंकज घोलप, श्री.प्रदिप गाढवे, श्री.बाळासाहेब होनराव, श्री.शेखर डुंबरे, सरपंच श्री.हिरामण शिंगोटे, श्री.यशवंत दाते, माजी मुख्याध्यापिका सौ.मंगल साबळे, माजी मुख्याध्यापक श्री.अशोक सहाणे, माजी मुख्याध्यापक श्री.युवराज कोटकर, माजी मुख्याध्यापक श्री.भागवत सरतापे, दाभोन (पालघर) येथील मुख्याध्यापक श्री.संजय स्वर्गीय इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच हरीश चौधरी, अभिजित थोरात, जगताप सर, बाठे सर, मुख्याध्यापिका सुमन घाडगे, विद्यालय मुख्याध्यापक संपत माने, स्वाती सोनवणे, पर्यवेक्षक कैलास महाजन, शिक्षक प्रतिनिधी संजय मेटकरी, प्रशांत फल्ले, प्रदिपकुमार मिरगे, रविंद्र अहिनवे, मनिषा पाटील, अच्युत निक्रड आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित विविध मान्यवरांनी राजकुमार मिरगे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
कामशेत, माळेगाव, फुलवडे, आलमे, कोळवाडी, जुन्नर, तळेरान, हिवरे, धामणखेल, सितेवाडी, करंजाळे, मंगरूळ, नारायणगाव, गोद्रे, ओतूर, उदापूर, डींगोरे, आंबेगव्हाण, आळेफाटा, येडगाव ई. परिसरातील व जिल्ह्यातील अनेक शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी राजकुमार मिरगे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमात राजकुमार मिरगे यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि आरामखुर्ची भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या कुटुंबियांचाही यथोचित गौरव करण्यात आला.
राजकुमार मिरगे यांनी आपल्या मनोगतात शाळेसाठी काम करताना तत्कालीन संचालक वै.प्रल्हाद पाटील व नितीन पाटील यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल आभार मानले आणि शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संकुलाच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री नितीन पाटील यांनी आपल्या मनोगतातून पुढील विचार व्यक्त केले. "गाडगे महाराज हे समाजसेवेचे जिवंत प्रेरणास्थान होते. त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या, समाजासाठी झटणाऱ्या आणि स्वच्छता, परोपकार व सेवा यांचा वसा जपणाऱ्या राजकुमार मिरगे सर यांचा सन्मान करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. त्यांचे कार्य गाडगे महाराजांच्या शिकवणीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीला व निःस्वार्थ कार्याला आमचा सलाम! भविष्यातही त्यांनी समाजाला अशीच प्रेरणा देत राहावी व श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूरच्या पुढील वाटचालीत मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडावी हीच शुभेच्छा."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा तांबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनिल डुकरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्यामुळे शाळा आणि लिपिक यांच्यातील स्नेहभाव अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
सदर कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्या सर्वांनी मिरगे सर यांचा यथोचित सन्मान केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, अधीक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय मौलिक कार्य व जबाबदारी पार पाडली.
सरांचा परिचय
नाव : श्री. राजकुमार वसंतराव मिरगे
वडील : वै.वसंतराव किसनराव मिरगे
आई : वै.सुमनबाई
जन्मगाव : दहिगाव, ता.नांदुरा, जि. बुलढाणा
जन्मतारीख : 30/12/1966
कौटुंबिक पार्श्वभूमी : आई वडील दोघेही शेतकरी.
प्राथ. शिक्षण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दहीगाव
माध्य. शिक्षण : दहिगांव एज्युकेशन सोसायटीचे डी. ई. एस. हाय स्कूल, दहिगाव
कॉलेज : आर.एल. टि. कॉलेज, अकोला व आय. टी.आय. खामगाव
नियुक्ती : 01-09-1987
पद : लिपिक
नेमणुकीचे ठिकाण : श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, ओतूर
प्रकल्प : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव
एकूण सेवा : 37 वर्ष
सेवानिवृत्ती दिनांक व पद : 31/12/2024 - लिपिक
कार्याचे स्वरूप व प्रेरणा : संत गाडगे महाराज यांचा सहवास लाभलेले वै. प्र. मा. पाटील साहेब यांच्यामुळे गाडगे महाराज यांच्या विचारांचा प्रभाव पडला व सेवाभावी वृत्तीने प्रामाणिकपणे काम केले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहिले.
इतर जबाबदा-या : कर्मचारी संघटना, विक्रमगड चे राज्यस्तरीय सरचिटणीस व प्रकल्पस्तरीय संघटनेचे 15 वर्ष अध्यक्ष म्हणून शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले.
अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी पतसंस्था स्थापन केली 5 वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम केले.
श्री गाडगे महाराज सेवक सहकारी पतसंस्था ओतूरचे 5 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केले.
शिक्षण विभागातील अधिकारी यांचेशी जिव्हाळ्याचे संबंध व त्या माध्यमातून अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न मार्गी लावले.
जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील अनेक शाळांना मार्गदर्शन केले.
प्रेरणास्थान : वै.प्र.मा.पाटील साहेब, डोके साहेब, शिक्षक, आई व वडील
राजकीय प्रेरणास्थान : वै. वल्लभशेठ बेनके, माजी आमदार
मार्गदर्शक :
1.श्री.मधुसूदन मोहिते पाटील, चेअरमन, श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई
2.श्री.विष्णुभाऊ नाचवणे, सचिव, श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई
3.श्री.सचिनभाऊ घोंगटे, सचिव, श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई
4.श्री.ज्ञानदेव महाकाळ साहेब, श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई
5.श्री. अशोक पाटील साहेब, श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई
6.सर्व पदाधिकारी व संचालक, श्री गाडगे महाराज मिशन मुंबई
कौटुंबिक सदस्य : भाऊ 2, बहीण 2
पत्नी : सौ. संध्या. गृहिणी
मुलगी : आकांक्षा देशमुख, इंजिनियर
जावई : श्री. रामेश्वर मुरलीधर देशमुख, इंजिनिअर
(जावई व मुलगी दोघेही बंगलोर येथे कंपनीमध्ये नोकरी करत आहेत.)
मुलगा : विवेक मिरगे, इंजिनीयर, MBA
पुरस्कार :
1.मा. गंगाधर म्हमाणे साहेब, शिक्षण संचालक पुणे यांचे हस्ते आदर्श लिपिक पुरस्कार
2. मा. अपर आयुक्त ठाणे यांचे कडून आदर्श लिपिक पुरस्कार
3. मा. प्रकल्पस्तरीय आदर्श शिक्षकेतर पुरस्कार
छंद : आपल्या पदाशी संबंधित नवीन माहिती शिकणे, शाळेचे काम अपडेट ठेवणे इत्यादी
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment