संतश्रेष्ठ श्री गाडगे महाराज यांच्या 62 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
सकाळ पासूनच मोठा उत्साह व चैतन्य शालेय परिसरात पसरलेले होते. विद्यार्थींनी व शिक्षिका यांची रांगोळी काढण्यासाठीची लगबग व दुसरीकडे शिक्षकांचा पाहुण्यांच्या स्वागतासाठी चाललेल्या तयारीचा अट्टहास आनंदात भर टाकत होता. संपूर्ण पटांगणात मंडप टाकल्याने जणू काही उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी 11 च्या सुमारास आजी व माजी विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली होती. आजी विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाची वाट पाहत होते, तर माजी विद्यार्थी... त्यात प्रामुख्याने सन 1999 ची बॅच अधिक संख्येने उपस्थित होती. आपल्या शाळेप्रती असलेले त्यांचे प्रेम व शिक्षकांविषयी असलेला आदरभाव स्पष्ट जाणवत होता. त्यांच्या विचारांतून गाडगे बाबांच्या विचारांचा व संस्कारांचा ऋणानुबंध जपला जात होता.
प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने सोहळा अधिक उल्हसित झाला होता. Volkswagen India चे DGM मा.श्री.अजय कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मा.श्री.शशिकांत सावरकर (मा.अतिरिक्त संचालक, संचालक, समाजकल्याण विभाग महाराष्ट्र राज्य), मा.श्री.नितीन अरुण पाटील (Volkswagen India), मा. डॉ.विजया वांजपे (अध्यक्ष, बालकल्याण समिती, पुणे), मा.सौ.जयश्री मोघे (सदस्य, बालकल्याण समिती, पुणे), ह.भ.प.सर्जेराव महाराज गाढवे, मा. डॉ.लक्ष्मण दानवडे (सदस्य, बालकल्याण समिती), मा. श्री. भानुविलास मामा गाढवे(मा.सदस्य, जि. प.पुणे), मा.श्री.बाळासाहेब घुले (सरपंच, ओतूर), मा.श्री.धनंजयशेठ डुंबरे (संचालक, विघ्नहर साखर कारखाना, जुन्नर), अन्नदाते मा.श्री.कृष्णराव शंकरराव पाटील (माजी प्राचार्य, अण्णासाहेब वाघिरे कॉलेज, ओतूर), मा.शाहीर श्री.भिमराव Thongire, सन 1999च्या एस.एस.सी. बॅचचे प्रतिनिधी मा.श्री. प्रकाशशेठ हिंगणे (आडतदार, मार्केटयार्ड ओतूर), मा.सौ.स्मिता ढोकरे - धानोरे (थायसन क्रॉप इंडस्ट्रीज इंडिया, पुणे) आदी मान्यवर उपस्थित होते.
एस.एस.सी.1999 च्या बॅच शिकविणारे बहुतांशी माजी शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित राहिल्याने या कार्यक्रमाची शोभा वाढली होती. न भूतो ना भविष्यती असा प्रसंग अनुभवण्याची संधी अनेक माजी विद्यार्थी उपस्थित राहून अनुभवत होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी दालनांचे उद्घाटन पार पडले आणि कार्यक्रमाची रंगत सुरू झाली.
गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. श्री गाडगे महाराज आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मंगल साबळे यांनी प्रास्तविक व अध्यक्षीय निवड केली. माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. राजू ठोकळ यांनी अहवाल वाचन केले.
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.युवराज कोटकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व सत्कार समारंभ पार पडला.
श्री.धीरजकुमार सोनवणे यांनी माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा गौरव करत सत्कार समारंभ संपन्न केला.
सन 1999 च्या बॅचच्या वतीने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुमारे 300 स्वेटरचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले.
Volkswagen India चे DGM मा.श्री.अजय कवडे यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. तसेच मुलांच्या कलागुणांना वाव देणारे हे उपक्रम राबविल्याने देशाच्या जडणघडणीत शाळांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत व्यक्त केले. मुलांनी उच्च ध्येय मनात ठेवून सतत कष्ट करत यशाची एक एक पायरी वर चढत जावी असा सल्लाही दिला.
श्री.दिपक पाटील व श्री.प्रशांत फल्ले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार केला.
विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांना वाव व संधी देणारे हस्तलिखित 'उन्मेष' व 'घोटूल' यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
माजी शिक्षक मा.श्री.एन. व्ही. पाटील सर यांनी आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाळेची भूमिका व श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलाचे योगदान स्पष्ट केले.
मा.श्री.शशिकांत सावरकर यांनी आपल्या अनुभवांची शिदोरी मुलांसमोर खुली करत भविष्यातील आव्हानांची त्यांना कल्पना करून दिली.
आभार श्री.सुनिल डुकरे यांनी मानले, तर गाडगे बाबांचे पसायदान श्री अशोक सोनोने यांनी सादर केले.
कार्यक्रमाची लय व सुसूत्रता सांभाळण्याचे काम श्री. रविंद्र अहिनवे व सौ.शोभा तांबे यांनी आपल्या सूत्रसंचालनातून केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापक समिती सदस्य, सर्व मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment