महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले व आदिवासी समाजाचा बुलंद आवाज संविधान सभेत आदिवासी समाजाच्या धोरणात्मक तरतुदीवर परखड भाष्य करणारे जयपाल सिंग मुंडा यांची जयंती श्री गाडगे महाराज आश्रमशाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बालिका दिनानिमित्त आपली मनागते सादर केली. तसेच ज्येष्ठ शिक्षिका शिंदे मॅडम यांनी सुंदर असे गीत सादर केले. श्री. प्रशांत फल्ले सर यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडला. श्री. राजू ठोकळ यांनी जयपाल सिंग मुंडा यांचे जीवनचरित्र आपल्या मनोगतातून सादर केले.
'फुले सावित्री नसती तर, मुलगी शिकली असती का' या गीतावर मुलींनी सुंदर असे प्रबोधनात्मक नृत्य सादर केले.
आश्रमशाळेचे शिक्षकेतर कर्मचारी रनजीत पवार यांनी भाषण करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तक भेट दिले.
या कार्यक्रमासाठी माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली डुंबरे व प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुमन घाडगे या उपस्थित होत्या.
बालिका दिनानिमित्त मुलींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती शिंदे मॅडम यांनी केले.
#gmvotur
#श्रीगाडगेमहाराजशिक्षणसंकुलओतूर
#श्रीगाडगेमहाराजमिशनमुंबई
#ओतूर
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment