श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, ओतूर येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
श्री गाडगे बाबांच्या दशकलमी संदेशानुसार कार्यरत असणाऱ्या आश्रमशाळा डोंगरदऱ्यांतील आदिवासी मुलांसाठी शिक्षण देण्यात नेहमीच अग्रस्थानी राहिलेल्या आहेत. वंचितांना शिक्षण देण्याच्या गाडगे बाबांच्या तत्त्वाचे पालन करत आज आश्रमशाळेत गुणवत्तापूर्ण व सुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. आश्रमशाळेतील मुलांना शिक्षण देत असताना इतर अनेक सुविधा पुरवाव्या लागतात याची कल्पना प्रास्तविकातून उपस्थितांना करून दिली. आज श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूरचे माजी विद्यार्थी मा.श्री.रमेश डुंबरे साहेब यांच्या संकल्पनेनुसार शाळेला भेट देण्यासाठी त्यांची वास्तुविशारद टीम आली होती. शालेय परिसराचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी आपल्या मनोगतात श्रीमती राजलक्ष्मी तेली ( वास्तुविशारद ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आर्किटेक्ट ( वास्तुविशारद ) ही संकल्पना समजावून सांगत असताना या क्षेत्रातील संधींची ओळख त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
सदर कार्यक्रमासाठी श्रीमती राजलक्ष्मी तेली, श्री सिध्दांत कोचर, श्री.सिध्दार्थ मेहेर, श्रीमती भार्गवी तळेकर, श्रीमती हिमानी लाहोटी हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती सुमन घाडगे होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शिक्षक श्री प्रशांत फल्ले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment