श्री गाडगे महाराज प्राथमिक / माध्यमिक आश्रमशाळा, ओतूर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी
श्री गाडगे महाराज, महात्मा फुले व प्र.मा.पाटील साहेब यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. वर्षभर शाळेत विविध उपक्रम होत असल्याने विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या कार्याची महती पटवून देणे खरे तर एक आवाहन होते. परंतु पुरेसे नियोजन व प्रबोधन यामुळे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांची ज्ञानरूपी तहान भागवता आली.
श्रीमती डुंबरे व्ही.बी. यांनी प्रास्ताविक करून महात्मा फुले यांचा जीवनवृतांत विद्यार्थ्यांसमोर मांडला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री ठोकळ आर.एल. (माध्यमिक मुख्याध्यापक) यांनी भूषवावे अशी सुचना मांडली. त्यास श्री निक्रड सर यांनी अनुमोदन दिले.
श्री. जगताप सर, श्री.खुळे सर, श्रीमती शिंदे Madam, विद्यार्थिनी कु.दिपाली हगवणे यांनी यांनी अतिशय प्रभावीपणे आपल्या भाषणांतून बालमनात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे चरित्र उभे केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्री ठोकळ आर.एल. यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महात्मा फुले यांच्या बालपणातील शिक्षण घेण्याच्या खडतर प्रयत्नांचा विचार मांडला. अशा पध्दतीने आज विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन केले.
श्री फल्ले पी.एस यांनी सर्वांचे आभार मानले. श्री. थोरात सर यांच्या सुमधुर आवाजात गाडगे बाबांचे पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री डुकरे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
=========================================================================
=========================================================================
Jyotirao Govindrao Phule was an Indian activist, thinker, social reformer and writer from Maharashtra.
Born: April 11, 1827, Katgun, Satara district
Full name: Mahatma Jyotirao Govindrao Phule
Spouse: Savitribai Phule (m. 1840–1890)
उपस्थित मान्यवर |
श्री.ठोकळ आर.एल. महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना |
0 comments :
Post a Comment
Thanks for your comment