शाळा असावी मनासारखी....नकोत नुसते वर्ग
मांडवी नदीच्या निसर्गरम्य किना-यावर शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे हे आपल्या शाळेचे प्रांगण म्हणजे स्वयंशिस्तीचे माहेरघर...
स्वयंशिस्त असेल तर माणूस घडतो याचा प्रत्यय अनेकांना आलेला आहे. त्याचेच फलित म्हणून आपले अनेक विद्यार्थी जगाच्या कानाकोप-यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे.
शिक्षण म्हणजे गुणवत्ता आणि गुणवत्ता म्हणजे गाडगे महाराज मिशन शाखेचे हे ओतूरमधील प्रांगण होय.
अनेक गोर गरीब, निराधार, आदिवासी मुलांसाठी हक्काचे घर म्हणून या शाळेकडे पाहिले जाते, संस्कारांची अनोखी शिदोरी जपत विद्यार्थी कुठे कोणत्याही गुणकौशल्यांत कमी पडू नयेत म्हणून परिश्रम घेण्याचे काम येथील सर्वच कर्मचारी करत असतात.
या सर्व कामांचे फलित म्हणून आपले अनेक माजी विद्यार्थी जेव्हा शाळेला भेट देतात, तेव्हा आपले पद, प्रतिष्ठा विसरून शिक्षकांच्या चरणी नतमस्तक होतात. याचा प्रत्यय नुकताच श्रावण सोमवारनिमित्त भरलेल्या कपर्दीकेश्वर यात्रेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी घडवून आणला.
श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित ओतूरची शाखा सदैव स्वागतासाठी तयार असते.

0 comments :
Post a Comment
Thanks for your comment